विकासकामात अडथळे सहन करणार नाही; शिवसेनेचा थेट इशारा

विकासकामात अडथळे सहन करणार नाही; शिवसेनेचा थेट इशारा

*कोंकण एक्सप्रेस*

*विकासकामात अडथळे सहन करणार नाही; शिवसेनेचा थेट इशारा*

*दोडामार्ग ; शुभम गवस*

दोडामार्ग–विजघर रस्त्याच्या कामाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून विकासकामात अडथळे आणले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) दोडामार्ग तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. रस्त्याच्या कामाविरोधातील आंदोलनाचा शिवसेनेने जाहीर निषेध केला.
तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी रस्त्याचे सर्वेक्षण व भूसंपादन पूर्ण झाले असून विकासकामात अडथळे आणल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा दिला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता ग्रामस्थ, शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी विकासकामे रोखण्यामागील हेतू संशयास्पद असल्याचा सवाल उपस्थित केला. सरकारने काम केले तरी विरोध आणि काम न केले तरी विरोध, हा दुहेरी निकष सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार समन्वय बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. “रस्ता होऊ द्या” हीच सर्वांची एकमुखी मागणी असल्याचे शिवसेनेने नमूद केले.
या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर व शैलेश दळवी, शिवसेना पदाधिकारी लक्ष्मण उर्फ बाळा नाईक, सुनील गवस, विलास सावंत, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, कार्यालयीन प्रमुख गुरुदास सावंत, महिला तालुका प्रमुख सौ. चेतना गडेकर, शहर प्रमुख सौ. शितल हरमलकर, उपविभाग प्रमुख सौ. उमा देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!