*कोंकण एक्सप्रेस*
*चलो कणकवली !*
*लॉटरी विक्रेत्यांची*
*रविवारी बैठक*
*कणकवली ः संजना हळदिवे*
महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेची विक्रेत्यांच्या न्याय हक्कांसाठीची विशेष बैठक येत्या रविवारी २८ डिसेंबर रोजी विक्रेत्यांचे आक्रमक नेते श्री. विलास सातार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती विक्रेता संघटनेचे सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुख संजय सावंत यांनी दिली.
महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्हयातील लाॅटरी विक्रेत्यांचा अस्तित्वाची लढाई आहे. विक्रेत्यांना रोजगार देणाऱ्या लाॅटरी च्या संरक्षणासाठी संघटना सज्ज आहे, असे स्पष्ट करुन जिल्हाप्रमुख सावंत यांनी या बैठकीला जिल्हास्तरीय विक्रेत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
हॉटेल रिलॅक्स, जानवली, आदर्शनगर जवळ, मुंबई-गोवा हायवे, कणकवली येथे रविवारी सकाळी ११ वाजता सभा होत असून मुंबईहुन लाॅटरी विक्रेत्यांचे नेते विलास कृ. सातार्डेकर विक्रेत्यांना मार्गदर्शन करणासाठी येणार आहेत. असेही सावंत यांनी सांगितले.
टिप -: सर्व विक्रेत्यांची चहा नास्ता,जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
याची नोंद घ्यावी.
*******

