अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण

*कोंकण एक्सप्रेस*

*अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भार सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे भव्य सायकल रॅली काढण्यात आली. याचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाला. या रॅलीमध्ये वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन बिडकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, बॅ.खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, नगरसेविका अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, सुरेंद्र चव्हाण, पत्रकार महेंद्र मातोंडकर, सचिन परूळकर, कोकण संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, समन्वयक शशिकांत कासले, स्वाती मांजरेकर, सत्यवान भगत यांच्यासह विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीनंतर वृक्षारोपणही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!