*कोंकण एक्सप्रेस*
*पिरामल स्वास्थ्य मार्फत चाफेड येथे 1 जाने. ला मोफत आरोग्य सेवा*
*शिरगांव : संतोष साळसकर*
पिरामल स्वास्थ्य मार्फत चाफेड ग्रामपंचायती मध्ये 1 जाने रोजी स. 10 ते दु. 1 वाजेपर्यंत मोफत ब्लडप्रेशर आणि डायबेटिस तपासणी निदान करून मिळणार आहे.
उपलब्ध असल्यास मोफत गोळ्या पुरवल्या जाणार आहेत. तरी गावातील 30 वर्षा वरील सर्व नागरिकांनी आपली मोफत तपासणी करून घ्यावी असे आवाहन सरपंच महेश राणे यांनी केले आहे. ज्या ग्रामस्थांना अगोदर पासून डायबिटीस, ब्लडप्रेशर अथवा इतर गोळ्या चालु असतील त्यांनी त्या दाखविण्यासाठी येताना घेऊन येणे.

