*दिलीप गिरप यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार*

*दिलीप गिरप यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार*

*कोंकण एक्सप्रेस*

*दिलीप गिरप यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेले माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पुन्हा एकदा आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष दालन फुलांनी सजिवण्यात आले होते. तब्बल चार वर्षे रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदावर आज दिलीप गिरप हे विराजमान झाले.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर 21 डिसेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत भाजपाने 20 पैकी 16 जागांवर विजय मिळविला. तर नगराध्यक्ष सुद्धा भाजपाचा निवडून आणण्यात यश मिळविले. निवडून आल्यानंतर जिल्हा बँक संचालक मनिष दळवी, संचालक महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पपू परब, रविंद्र मडगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यमान नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपाचे सोळाही नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच श्री.गिरप यांच्या चाहत्यांनी उपस्थिती दर्शवित दिलीप गिरप यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. गेली चार वर्षे निवडणुकी अभावी नगराध्यक्ष निवडला नसल्याने नगरपरिषदेमधील नगराध्यक्ष दालन हे बंदच स्थितीत होते. दरम्यान, आज हे दालन उडण्यात आले. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला जाणार असल्याने या दालनाच्या प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली होती. तत्पूर्वी सर्व लोकप्रतिनिधींनी भाजपाच्या कार्यालयाकडे एकत्र येत पक्ष कार्यालय, दाभोली नाका, बाजारपेठ ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. त्यानंतर स्वामी विवेकांनद सभागृहात स्वामी विवेकांनद यांच्या पुतळ्याला गिरप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे दाजी परब, दादा केळुसकर, साईप्रसाद नाईक, ज्ञाने·ार केळजी, एम.जी.मातोंडकर, हेमंत गावडे, सत्यविजय गावडे, नितीन चव्हाण, मनोज उगवेकर, धर्मराज कांबळी, प्रार्थना हळदणकर, पुंडलिक हळदणकर यांच्यासहीत कार्यकर्ते व गिरप कुटुंबिय उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष गिरप म्हणाले की, मागच्या पाच वर्षात भाजपाच्या माध्यमातून आम्हाला विकासासाठी भरघोस निधी मिळाला. जसजसा निधी आम्ही मागत गेलो, तसतसा आम्हाला निधी मिळत गेला आणि तो आम्ही मार्गी लावला. परिणामी, विकासाच्यादृष्टीने कायपालट झाला. अनेक कामे मार्गी लावली. यामुळे या निवडणुकीत नागरिकांकडे आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन गेलो. विरोधक आमच्यावर वैयक्तिक टिका करीत होते. परंतु, त्यांच्या टिकेला उत्तर न देता वेंगुल्र्याचा विकास हेच आम्ही डोक्यात ठेवले. या सर्व वाटचालीत भाजपाचे वरिष्ठ नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचे मोलाचे पाठबळ मिळाले. आता आमची जबाबदारी वाढली आहे, आम्ही सर्व सतरा जणांची टिम घेऊन वेंगुल्र्याच्या विकासासाठी झोकून घेऊन काम करू असे सांगितले.
या निवडणुकीत एक वेगळे वातावरण सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत पहायला मिळाले. वॉर्डातील प्रत्येक बैठकीला नागरिक स्वत:हून सांगत होते, यावेळी पुन्हा आम्हाला गिरप यांना मत द्यायचे आहे. कारण, त्यांनी आमचे प्रश्न सोडविले आहेत. सुनियोजित काम करणा-या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी दिली. या पाच वर्षाच्या कारकिर्दीत पारदर्शक, गतिमान आणि स्वच्छ असा कारभार केला पाहिजे. हे एक मंदिर आहे, असे समजून आपण काम करावे. नगरवासीयांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना परमे·ाराने द्यावी. प्रत्येकाच्या विजयात पक्ष संघटनेचा मोठा वाटा असल्याने सर्वांनी पक्ष संघटनेबरोबर प्रामाणिक काम करावे. आपल्या भागाचा विकास करताना भाजपाची संघटना अधिक प्रभावीपणे उभी राहिली पाहिजे, प्रत्येक नागरिक भाजपाबरोबर जोडला गेला पाहिजे अशा पद्धतीने काम कराल अशी अपेक्षा जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले. तसेच आपटे यांचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!