शिरोडा येथे 25 रोजी प्रेरणा साहित्य संमेलन

शिरोडा येथे 25 रोजी प्रेरणा साहित्य संमेलन

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरोडा येथे 25 रोजी प्रेरणा साहित्य संमेलन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

साहित्य प्रेरणा कट्टा आजगांव तर्फे शिरोडा येथील स्व.रघूनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत प्रेरणा साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नामवंत साहित्यिक व साहित्यिक चळवळतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण देशमुख (कल्याण) हे उपस्थित रहाणार असून स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध पुस्तकप्रेमी भालचंद्र जोशी (झोळंबे-दोडामार्ग) हे लाभले आहेत. सकाळी 10 वा. संमेलनाचे उद्घाटन, 12.15 ते 12.45 या वेळेत “साहित्यिक संस्थांचे समाजजागृतीत योगदान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे अजित राऊळ, कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गचे मंगेश मसके आणि साहित्य संगम मांद्रेचे प्रा.गजानन मांजरेकर आदी सहभागी होतील. दुपारी 1.30 वा. सुप्रसिद्ध साहित्यिक कै.कुसुमाग्रज स्मृती वाचन साधना उपक्रमाचे प्रसाद रेगे (कुडाळ) यांच्या हस्ते उद्घाटन, दुपारी 2 वा. कवयित्री अर्पणा परांजपे-प्रभू (देवगड) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. सायं. 3.14 ते 4.15 पर्यंत “स्मरणरवि-शंकरराव’ (अर्थात कै.रवींद्र पिंगे व कै. शंकर पाटील) हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यात प्रा.निलम कांबळे, रवींद्र पणशीकर, विनय सौदागर व प्रा.मानसी शेट मांद्रेकर सहभागी होतील. सायं. 4.15 ते 4.30 या वेळेत शिरोडा येथील विद्याथ्र्यांचा गौरव आणि त्यानंतर संमेलनाचा समारोप होईल.
या प्रेरणा साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमींनी मोठ¬ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!