साळशी हायस्कुलचा 16 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा

साळशी हायस्कुलचा 16 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी हायस्कुलचा 16 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा*

*शिरगाव : संतोष साळस्कर*

देवगड तालुक्यातील साळशी ग्रामविकास मंडळ साळशी संचलित माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेचा सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साळशी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सत्यवान भास्कर सावंत हे असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साळशी सरपंच सौ. वैशाली सुतार, चाफेड सरपंच महेश राणे, भरणी सरपंच अनिल बागवे, माईन सरपंच सौ. निकिता पाडावे, शिक्षणप्रेमी विजय गावकर, किशोर लाड, डॉ. श्रीमती. रूपाली घाडी, श्रीमती. दिपाली साळस्कर, श्रीमती. संपदा मिराशी – भगत, शिरगाव ग्राम विकास अधिकारी मंगेश साळस्कर, मुख्याध्यापक संजय मराठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दिवशी सकाळी 9 वा. साळशी ग्रामपंचायत येथे विद्यार्थ्यांचे फूड फेस्टिवल सायं.7.30 वा. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम यात विद्यार्थ्यांचे नृत्य, नाटिका सादरीकरण, आधी विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर होणार आहेत.
तरी या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक संजय मराठे, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले, व सर्व पदाधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी कु. जान्हवी गावकर, कु. संचित घाडी, सांस्कृतिक प्रतिनिधी कु. तनिषा गावकर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!