एकता दिव्यांग विकास संस्थाचे सदस्य अशोक पाडावे यांचे निधन

एकता दिव्यांग विकास संस्थाचे सदस्य अशोक पाडावे यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*एकता दिव्यांग विकास संस्थाचे सदस्य अशोक पाडावे यांचे निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तालुक्यातील हुंबरठ गावातील अशोक प्रभाकर पाडावे ( वय ५१ ) यांच गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अशोक पाडावे यांच्या निधनाने संपूर्ण हुंबरठ गाव हळहळला आहे.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा सदस्य व एकता दिव्यांग विकास संस्था चे ते सदस्य होते. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांचे मोठे योगदान असायचे. अशोक पाडावे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता हुंबरठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!