शिरगांव हायस्कूलचे आज वार्षिक पारितोषिक वितरण

शिरगांव हायस्कूलचे आज वार्षिक पारितोषिक वितरण

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगांव हायस्कूलचे आज वार्षिक पारितोषिक वितरण*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संस्थाध्यक्ष अरुण कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कवी व गीतकार प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत १२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ८:३० वाजता फनी गेम्स आणि फूडस्टॉल उद्घाटन, ८:४५ वाजता रांगोळी प्रदर्शन, ९ वाजता खुल्या पाककला स्पर्धा, १० वाजता अल्पोपहार, १०:३० वाजता अरुणोदय हस्तलिखिताचा प्रकाशन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, सायंकाळी ६ वाजता विद्यार्थी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना संस्था पदाधिकारी, संचालक, सभासद, हितचिंतक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!