आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्रातील पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या एका पत्रकारास सन 2024-25 चा श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती “आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या पुरस्कारासाठी पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीने अथवा त्या पत्रकारांच्यावतीने त्यांच्या निकटवर्तीयांनी संबंधित पत्रकारांचे अर्ज पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
वेंगुर्ला नगर वाचनालय संस्थेतर्फे सन 2017 पासून अनिल सौदागर पुरस्कृत श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती “आदर्श पत्रकार पुरस्कार’ वितरीत केला जात आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रूपये 5000 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 24 डिसेंबरपर्यंत इच्छुकांनी आपले अर्ज संस्थेच्या कार्यालयात आणून द्यावेत. पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी अनिल सौदागर (बाजारपेठ-वेंगुर्ला) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!