*कोंकण एक्सप्रेस*
*साळीस्ते येथील महापुरुष देवस्थानचा भूमिपूजन सोहळा 7 डिसेंबरला*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
साळीस्ते रांबाडेवाडी येथील श्री महापुरुष देवस्थान मंदिराचा भूमिपूजन समारंभ रविवारी (ता. 7 डिसेंबर) सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापुरुष देवस्थान हे जागृत देवस्थान असून दरवर्षी मे महिन्यात वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि एकोप्याने साजरा केला जातो. त्यासाठी मुंबईस्थित सर्व चाकरमानी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करतात. या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

