कुडाळकर हायस्कुलच्या मुलांना दप्तर वाटप

कुडाळकर हायस्कुलच्या मुलांना दप्तर वाटप

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळकर हायस्कुलच्या मुलांना दप्तर वाटप*

*मालवण (प्रतिनिधी)*

लायन्स क्लब मालवणचे ज्येष्ठ सदस्य मेघश्याम उर्फ राजा शंकरदास यांनी त्यांची मुलगी सामाजिक कार्यकर्त्या कै. पूजा शंकरदास (नेहा कोळंबकर) यांच्या स्मरणार्थ तिच्या वाढदिवसादिनी मालवण मधील एस.एस. कुडाळकर हायस्कूलच्या गरजू मुलांना दप्तर वाटप करून कै.पूजा यांच्या स्मृतीला उजाळा दिला. तसेच शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप केले.

यावेळी राजा शंकरदास यांच्यासह लायन्स क्लब अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, सदस्य गणेश प्रभूलकर, उमेश शिरोडकर, अंजली आचरेकर, नंदिनी गांवकर ऋग्वेदा धामापूरकर, अंकित शंकरदास, वृषाली धुरी यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!