*’सात जन्मांची शपथ आणि लोकशाहीची नाळ’ – नववधूचे प्रेरणादायी मतदान!*

*’सात जन्मांची शपथ आणि लोकशाहीची नाळ’ – नववधूचे प्रेरणादायी मतदान!*

*कोंकण एक्सप्रेस*

*’सात जन्मांची शपथ आणि लोकशाहीची नाळ’ – नववधूचे प्रेरणादायी मतदान!*

*सोनेरी पोशाखात सजलेली नववधू थेट मतदान केंद्रात;श्रध्दा परब या नववधूने बजावला मतदानाचा हक्क*

*जिल्ह्यात अनेक ठिकाणी नववधूंनी बजावला मतदानाचा हक्क*

*सिंधुदुर्गनगरी दि 2 (जिमाका)*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंयाचतीसाठी मतदान होत आहे. कणकवली येथील विद्या मंदिर मतदान केंद्रावर एक भावनिक आणि प्रेरणादायी दृश्य पाहायला मिळाले. नवजीवनाची स्वप्नं डोळ्यात साजरी करणारी श्रध्दा परब ही नववधू, हातावर मेहंदीचा रंग, कपाळावर कुंकू आणि अंगावर लग्नाचा पोशाख घालून थेट मतदान केंद्रात दाखल झाली- आपला लोकशाहीचा हक्क बजवण्यासाठी.
लग्नाची घाई, नवरदेवाचे स्वागत, पाहुण्यांची लगबग… सर्व काही बाजूला ठेवून या नववधूने ‘पहिले कर्तव्य-मग समारंभ’ अशी प्रेरणा देत मतदान केले. तिच्या दर्शनाने मतदान केंद्रातील वातावरणच उजळून निघाले. येणाऱ्या मतदारांनी कौतुकाने टाळ्या वाजवत तिचा सन्मान केला.
‘लग्न हा आयुष्यातील मोठा दिवस आहे, पण देशासाठीचा माझा हक्क आणि कर्तव्य याहून मोठं आहे,’ असे श्रध्दा परब हिने मतदानानंतर भावूक होत सांगितले. तिच्या या कृतीने विशेषत: तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मुलींमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
आजची ही नववधू केवळ कुटुंबासाठीचा शुभारंभ नव्हे, तर लोकशाहीच्या मंगलसूत्राशी जोडलेली कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणूनही कायम लक्षात राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!