*कोंकण एक्सप्रेस*
*तळेरेतील योगेश वायंगंणकरची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी नेमणूक*
*कासारडे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे गावचे सुपुत्र, शरीरसौष्ठव पटू योगेश महिपत वायंगणकर यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी (ASI) पदोन्नती झाली आहे. याबद्दल त्यांचे तळेरे वासिय आणि मित्र मंडळी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रचंड मेहनत आणि अपार कष्ट करत त्यांनी गेली 16 वर्षे त्यांनी मुंबई आणि गडचिरोली येथे विविध पदावर सेवा केली असून एक उत्तम शरीरसौष्ठव पटू म्हणूनही त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई येथे नावलौकिक मिळविला आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेत आपल्या पिळदार शरीर यष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुंबई सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांनी अशा स्पर्धेत यशही प्राप्त केलेले आहे. त्यांचे पूर्ण शिक्षण तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयामध्ये झाले असून त्यांच्या या पदोन्नतीमुळे सर्वत्र अभिनंदन करत आहेत

