सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नद्यांवरील तसेच कणकवली शहरातील गडनदीवरील के. टी. बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यात यावे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नद्यांवरील तसेच कणकवली शहरातील गडनदीवरील के. टी. बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यात यावे*

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नद्यांवरील तसेच कणकवली शहरातील गडनदीवरील के. टी. बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यात यावे*

*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी*

*कासारडे प्रतिनिधी ; संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नद्यांवरील तसेच कणकवली शहरातील गडनदीवरील के. टी. बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यात यावे अशी आग्रही मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी संदीप निखार्गे – कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी-ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाळ्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर कमालीची घट होत चालली आहे. पुढे त्याचा परिणाम होऊन विहिरींची तसेच नळयोजना सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांवरती त्याचा परिणाम होतो. तसेच शेती आणि जनावरांना देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासते. या सगळ्याचा विचार करून ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व नद्यांवरील तसेच कणकवली तालुक्यातील गडनदी पात्रातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी संबंधित विभागाने यावरती तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व मोठ्या नद्यांवरील बंधाऱ्यात तसेच कणकवली गडनदीवरील के. टी. बंधाऱ्यातील पाणी लवकरात लवकर अडविण्यासाठी लोखंडी प्लेट्स टाकून नद्यांमधील पाणी अडविण्यासाठी संबंधित विभागाने पाणी अडविण्यासाठी ज्या लोखंडी प्लेट्स वापरल्या जातात त्या प्लेट्स चांगल्या दर्जाच्या वापराव्यात, जेणेकरुन बंधाऱ्यात अडविलेले पाणी वाहून वाया जाऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी याप्रश्नी संबंधित विभागाचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!