मोरगावात अनधिकृत 33 केव्ही विद्युत काम; रविकिरण गवस यांच्या हस्तक्षेपाने काम बंद

मोरगावात अनधिकृत 33 केव्ही विद्युत काम; रविकिरण गवस यांच्या हस्तक्षेपाने काम बंद

*कोंकण एक्सप्रेस*

*मोरगावात अनधिकृत 33 केव्ही विद्युत काम; रविकिरण गवस यांच्या हस्तक्षेपाने काम बंद*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

मोरगाव–आडाळी मार्गावर PWD ची परवानगी न घेता 33 केव्ही लाईनचे खांब उभारत असल्याचे उघड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रविकिरण गवस यांनी हे काम थांबवले.
PWD चे कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे यांनी संबंधित ठेकेदाराला काम थांबवण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांच्या जमिनीत नुकसानभरपाई न देता विद्युत खांब उभे केले जात आहेत. तसेच 50 मीटर परिसरात बांधकाम करता येणार नसल्याची वीज विभागाकडून माहिती दिल्यामुळे शेतकरी अडचणीत येणार असल्याचेही नमूद केले.
रविकिरण गवस यांनी PWD ने तातडीने पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!