*कोंकण एक्सप्रेस*
*तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नगर वाचनालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता वेंगुर्ला नगर वाचनालय संस्थेच्या लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
वाचक स्पर्धेसाठी “गंगाराम गवाणकर यांची कोणतीही साहित्यकृती’ यावर 10 मिनिटांमध्ये परीक्षण सादर करावयाचे आहे. स्पर्धक हा वेंगुर्ला तालुक्यातील कोणत्याही वाचनालयाचा सभासद असावा. वेंगुर्ला शहराबाहेरून येणा-या स्पर्धकाला येण्याजाण्याचा प्रवास खर्च रूपये 100 देण्यात येईल. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 500, 250, 150 अशी पारितोषिके देण्यात येतील. इच्छुक स्पर्धकांनी वाचनालयाच्या माध्यमातून 10 डिसेंबरपर्यंत वेंगुर्ला नगर वाचनालय येथे आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर आणि कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

