*कोंकण एक्सप्रेस*
*एस.आर.दळवी फाऊंडेशनच्या वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी प्रसाद जाधव*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
एस.आर.दळवी फाऊंडेशनच्या वेंगुर्ला तालुका नविन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी प्रसाद जाधव तर सचिवपदी ललिला जाधव यांची निवड करण्यात आली.
एस.आर.दळवी फाऊंडेशन ही संस्था शिक्षक सक्षमिकरण व पर्यावरण संवर्धन हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन स्थापन करण्यात आली आहे. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेणारी व्यक्ती या संस्थेत सहभागी होऊ शकते. शिक्षकांचा व्यावसायीक विकास व्हावा, त्यांना शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांमधील सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण व्हावे, विविध स्पर्धा तसेच शालेय विद्याथ्र्यांसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविणारी अशी ही संस्था आहे.

संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन नुतन अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी केले. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-शालिक पाटील (सदस्यत्व विकास) व रामा पोळजी (कार्यक्रम), सहसचिव-विश्वनाथ जगताप तर सल्लागार म्हणून रवी थोरात व रेश्मा वरसकर यांचा समावेश आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक रामचंद्र दळवी, सीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष महेश सावंत, जिल्हाध्यक्ष चेतन बोडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रसाद गावडे यांच्या प्रयत्नातून करण्यात आली

