*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी प्रशालेत कृषी विषयक माहिती कार्यशाळा संपन्न*
*विद्यार्थ्यांनी केले महाविस्तार ए आय अँप चे रजिस्ट्रेशन*
*कनेडी ः प्रतिनिधी*
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत महाविस्तार ए आय रजिस्ट्रेशन व कृषी विषयक माहिती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. कृषी विभाग कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वार- शुक्रवार, दिनांक- २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तंत्रज्ञान-आधारित सुविधा आता उपलब्ध झाली आहे. राज्याच्या कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘महाविस्तार-एआय (MahaVISTAAR-AI)’ नावाचे मोबाईल ॲप नुकतेच लॉन्च केले आहे.
शेतकऱ्यांचा ‘डिजिटल मित्र’ म्हणून ओळखले जाणारे हे ॲप, त्यांना शेतीसंबंधी अचूक आणि तत्काळ माहिती पुरवण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे प्रत्यक्ष महाविस्तार ए आय ॲपचे रजिस्ट्रेशन करून कृषी विभागाची माहिती सन्मा. दुर्वा झुलपे मॅडम, मंडल अधिकारी कणकवली यांच्या कडून समजून घेतली. या वेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कृषी विषयक योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये:
मराठीतील एआय चॅटबॉट: या ॲपमध्ये मराठी भाषेतील एक अत्याधुनिक चॅटबॉट देण्यात आला आहे. शेतकरी आपला कोणताही कृषीविषयक प्रश्न मराठीत विचारू शकतात आणि त्याला काही सेकंदांत अचूक उत्तर मिळते.
सर्वांगीण कृषी माहिती:
हवामान अंदाज: अचूक हवामान माहिती.
बाजारभाव: पिकांचे ताजे बाजारभाव.
पीक व्यवस्थापन: पेरणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि पीक-विशिष्ट सल्ला.
रोग-कीड निदान: पिकांवरील रोग आणि कीड ओळखणे व त्यांच्या नियंत्रणाचे उपाय.
सरकारी योजना: विविध कृषी योजनांची माहिती.
ऑडिओ-व्हिडिओ मार्गदर्शन: शेतकऱ्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात शेतीपूरक मार्गदर्शन उपलब्ध होते.
या कार्यशाळेसाठी वैष्णवी ठाकूर मॅडम, उप कृषी अधिकारी, मृणालिनी वर्णे मॅडम, कृषी सहाय्यक सांगवे, साधना जाधव मॅडम, कृषी सहाय्यक दिगवळे, शितल सावंत मॅडम, कृषी सहाय्यक कुंभवडे यांनी विद्यार्थ्यांना सहाय्यक मार्गदर्शक म्हणून सहकार्य केले. सदर कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुमंत दळवी, तर सुत्रसंचालन श्री. प्रशांत माने यांनी केले.

