श्री रामेश्वर जत्रौत्सव १५ नोव्हेंबर रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री रामेश्वर जत्रौत्सव १५ नोव्हेंबर रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि. १५ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.

यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, केळी-नारळ ठेवणे, रात्रौ १० वा. तरंगदेवता व श्री सातेरी पालखीच्या आगमन झाल्यावर श्री रामेश्वर, श्री नागनाथ-भगवती, श्री गणपती-दत्त व लालखी यांची मंदिराला प्रदक्षिणा, त्यानंतर वालावलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी जत्रौत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!