*कोंकण एक्सप्रेस*
*गावराई सरपंच सोनल शिरोडकर शिदेशिवसेनेत*
*सिधुदुर्गनगरी*
गावराई गावच्या सरपंच सोनल शिरोडकर यांनी बाळासाहेबांची (शिंदे ) शिवसेनापक्षात जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे
कुडाळ तालुक्यातील गावराई येथील सरपंच सोनल शिरोडकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पक्षाची शाल स्वीकारून प्रवेश केला आहे गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्यावर उबाठा ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपाच्या एका सदस्याला हातीशी धरून सरपंचावर अविश्वास दाखल केला होता या अविश्वास कालावधीत जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत,तालुकाप्रमुख विनायक राणे,विभाग प्रमुखपरशुराम परब कसाल सरपंच राजन परब आणि गावराई गावातील तरुण युवक महिला ग्रामस्थांनी या विश्वासाच्या विरोधात गावात लोक जागृती करून या अविश्वासापासून सरपंच सोनल शिरोडकर यांना वाचविण्यासाठी मेहनत केली त्याचबरोबर अनेक विकासकामाना चालना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले हे गावाच्या विकासाला दिशा देणारेच ठरले आहे दरम्यानच्या काळात भाजपाच्या सरपंच श्रीमती सोनल शिरोडकर या एकाकी पडल्या होत्या त्यातही त्यांना पक्षाकडून पाठबळ मिळाले नाही, त्या काळात उलट आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख दताजी सामंत यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत सातत्याने पंधरादिवस मेहनत घेऊन सरपंचाच्य बाजुने लोकमत आणण्यासाठी रात्र दिवस तेथील कार्यकत्या समवेत मेहनत घेतली त्याचेच फळ सरपंचाना मिळाले असे अनेक कार्यकत्यांनी सांगितले, या अविश्वासानंतर आता गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या विविध प्रश्नांना चालना देण्यासाठी आपण सरपंच म्हणून सतत पाठपुरावा करा त्यासाठी आमदार निलेश राणे व मी स्वतः दत्ताजी सामंत आपल्या पूर्ण पाठीशी राहू जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करू दरम्यानच्या काळात भविष्यात या गावातील जास्तीत जास्त कामे मार्गी लावून कुडाळ मालवण मतदार संघ आदर्श विधानसभा मतदारसंघ करण्याच्या स्वप्नामध्ये गावराई गाव एक आदर्श गाव करण्याचा आपण प्रयत्न करूया आपण सर्वांनी संघटितपणे काम करूया असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांनी यावेळी केले.यावेळी गावातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते . शेवटी उपसितांचे आभार मानण्यात आले.

