*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथ संचलन..*
*वेंगुर्ले प्रतिनिधी : प्रथमेश गुंरव*
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन, आज गुरुवारी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉब डिस्पर्सल व दंगा काबू योजना (पथ संचलन) राबविण्यात आली.
या उपक्रमाचे मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी श्री. विनोद कांबळे यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत पोलीस दलाने शहरात पथ संचलन केले.
पथ संचलनादरम्यान वेंगुर्ला बाजारपेठ, चार गदा मारुती मंदिर परिसर, गाडी अड्डा, दाभोली नाका व शिरोडा नाका या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता. नागरिकांमध्ये निवडणूक काळात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेचा संदेश देण्यासाठी हे संचलन करण्यात आले. या संचलनात पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या सह ३ पोलीस अधिकारी, २० पोलीस अंमलदार, १ आर.सी.पी प्लाटून तसेच १० होमगार्ड सहभागी झाले होते. संपूर्ण उपक्रम शांततेत पार पडला असून, निवडणूक काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क आहे, असे यावेळी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सांगितले.

