पोटहिश्शाची मोजणी आता फक्त ₹200 मध्ये! खासगी भूमापकांनाही मिळाला जमीन मोजणीचा अधिकार

पोटहिश्शाची मोजणी आता फक्त ₹200 मध्ये! खासगी भूमापकांनाही मिळाला जमीन मोजणीचा अधिकार

*कोंकण एक्स्प्रेस*

*पोटहिश्शाची मोजणी आता फक्त ₹200 मध्ये! खासगी भूमापकांनाही मिळाला जमीन मोजणीचा अधिकार*

🤗 शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! शेतीच्या बांधावरून आणि हद्दी – खुणांवरून होणारे वाद आता थांबणार आहेत! महसूल व वन विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता परवानाधारक खासगी भूमापक देखील जमिनीची मोजणी करू शकतील.

📜 नव्या नियमांनुसार काय ठरलं आहे?
1️⃣ खासगी भूमापकांना भूमिअभिलेख अधीक्षकांकडून परवाना घ्यावा लागेल.
2️⃣ त्यासाठी उमेदवाराने डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेला असावा.
3️⃣ एका कुटुंबातील प्रत्येक पोटहिश्शासाठी फक्त ₹200 शुल्क आकारले जाणार आहे.
4️⃣ मोजणी पूर्ण झाल्यानंतर हद्दी व खुणांची तपासणी तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयातून केली जाणार आहे.
5️⃣ शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ई-मोजणी व्हर्जन 0.2 अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

🚜 शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा
🌿 शेतकऱ्यांना आता जमिनीच्या मोजणीसाठी महिनोन्‌महिने थांबावे लागणार नाही.
🌿 कमी खर्चात आणि जलद पद्धतीने जमीन विभागणी होणार.
🌿 वाद-विवाद कमी होऊन कुटुंबातील शांतता टिकेल.

📅 शासनाचा निर्णय
📌 महसूल व वन विभागाने 1 सप्टेंबर 2025 रोजी यासंदर्भात राजपत्र प्रसिद्ध केले आहे.
📌 त्यानंतर परिपत्रक जाहीर करून अमलबजावणीची तयारी सुरु आहे.
📌 हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

📜 शासनाचे परिपत्रक काय सांगते?
📘 महाराष्ट्र जमीन महसूल (हद्द व हद्दीखुणा) नियम 1969 च्या नियम 13(2) नुसार —
* एकत्र कुटुंबाच्या जमिनींच्या वाटणीसाठी मोजणी फी ₹200 प्रति हिश्शा ठरवली आहे.
* नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे कलम 85 नुसार विभाजन होणार.
* सर्व भूमिअभिलेख कार्यालयांना ही प्रक्रिया ई-मोजणी प्रणालीद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!