*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली–देवगड विधानसभा संपर्क अध्यक्ष श्री. संतोष भाऊ शिंगाडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज कणकवली विधानसभा मतदारसंघातील
स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत क्षेत्रातील उप जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका संपर्क अध्यक्ष, विभाग अध्यक्ष तसेच इतर प्रमुख पदाधिकारी
यांची महत्त्वपूर्ण बैठक हॉटेल सावली, कणकवली येथे पार पडली.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकटीकरण, नियोजन तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब,
उप जिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, गणेश वाईरकर,
जिल्हा सचिव सचिन तावडे,
प्रसिद्धी माध्यम प्रमुख महेश नलावडे,
कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये,
देवगड तालुकाध्यक्ष संतोष मयेकर,
वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम,
देवगड तालुका संपर्क अध्यक्ष नितीन पवार,
सह संपर्क अध्यक्ष अमोल खोत,
मनविसे जिल्हा संपर्क अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे,
मनविसे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे,
मनविसे उप जिल्हाध्यक्ष राजा मीराशी,
मनविसे देवगड तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव,
तसेच इतर उप तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

