*कोंकण एक्सप्रेस*
📚 दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ विषयात २५ गुण मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण!
➖➖➖➖➖
🌟 आता तुमच्या WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻
https://chat.whatsapp.com/GowSUegfPidH1f5tki3oyh?mode=wwt
➖➖➖➖➖
इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
📅 बारावी – १० फेब्रुवारीपासून
📅 दहावी – २० फेब्रुवारीपासून
परीक्षेची तारीख जसजशी जवळ येते, तसतसे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. मात्र या वर्षीचे नियम विद्यार्थ्यांसाठी खूपच सोपे आणि फायद्याचे आहेत.
📚 त्रिभाषा सूत्रामुळे दहावीची परीक्षा सोपी!
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाने त्रिभाषा सूत्र लागू केले आहे.
👉 मराठी + हिंदी + इंग्रजी या तीन विषयांमध्ये एकत्रित गुण पाहिले जातात.
🧾 उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण:
📖 या तीन विषयांत एकूण १०५ गुण आवश्यक.
% जर एखाद्या विषयात फक्त २५ गुण आले तरी चालतील,
= पण तिन्ही विषयांचे एकत्र गुण १०५ झाले, तर विद्यार्थी उत्तीर्ण!
📘 उदाहरण:
* मराठी – ४०
* हिंदी – २५
* इंग्रजी – ४०
➡ एकूण = १०५ गुण ✅ मिळाले म्हणजे विद्यार्थी पास!
🔢 गणित आणि विज्ञानाचे नवीन सूत्र
📐 गणित आणि 🔬 विज्ञान या दोन विषयांचे मिळून ७० गुण झाले, तर विद्यार्थ्याला त्या विषयांत उत्तीर्ण समजले जाईल.
✌🏻म्हणजेच आता प्रत्येक विषयात जास्त गुण मिळवण्याची भीती नाही, तर एकत्रित गुणांची गणना केली जाईल.
🏫 विद्यार्थ्यांना सल्ला
🎯 विद्यार्थ्यांनी आता ताण न घेता फक्त नियोजनावर भर द्यावा.
📱 मोबाईलचा वापर कमी करा.
🗓 प्रत्येक विषयासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.
🧾 जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा.
✍ कृतिपत्रिकांमध्ये प्रात्यक्षिक आणि वस्तुनिष्ठ प्रश्न सोपे असतात.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी 📚 फक्त २५ गुण एका विषयात मिळाले तरी 💪 तुम्ही होऊ शकता उत्तीर्ण! आता फक्त अभ्यासाला सुरुवात करा आणि आत्मविश्वास ठेवा! 😇👏
➖➖➖➖➖

