कोकणरत्न‘ पदवीसाठी संजय घोगळे यांची निवड

कोकणरत्न‘ पदवीसाठी संजय घोगळे यांची निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*‘कोकणरत्न‘ पदवीसाठी संजय घोगळे यांची निवड*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि अपर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे ‘कोकणरत्न‘ पदवीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. १३ डिसेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पदवी प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी वरिष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष धनंजय कुवेसकर यांनी दिली आहे. दरम्यान, श्री.घोगळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!