ओझरम-तीर्थवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीची वारी उत्साहात संपन्न

ओझरम-तीर्थवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीची वारी उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*ओझरम-तीर्थवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीची वारी उत्साहात संपन्न*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती (रजि.) ओझरम, तीर्थवाडी, रुक्मिणी महिला मंडळ तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाने मोठया उत्साहात व भक्तिमय वातावरणात सात प्रहरांचा सप्ताह दिमाखात साजरा झाला.
दि. २ नोव्हेंबर रोजी रामप्रहरी काकडा आरतीने सुरु झालेला हा वारीचा उत्साह पूर्ण दिवस-रात्र अभिषेक, पूजा-अर्चा व बहारदार वारकरी भजनात तल्लीन होत आनंदात साजरा झाला.
सप्ताहाची सुरुवात ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ व गावातील-वाडीतील प्रमुख देवदेवतांना मानकऱ्यांनी गाऱ्हाणे घालून केली. यावेळी मुंबई, पुणे व स्थानिक महिला, पुरुष, मुले, मुली यांची उपस्थिती लक्षणीय होती. मंदिरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात आरती, भजने, हरिपाठ, स्तोत्र अखंड चालू होते.
ओझरम तीर्थवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात पिढ्यान् पिढ्या आषाढी, कार्तिकी एकादशीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होतो. पिढ्यान् पिढ्या चालू असलेली ही वार्षिके म्हणजे तीर्थवाडीतील प्रत्येक कुटुंबासाठी वर्षभराचा विठुरायाने दिलेला आशीर्वाद असतो.
विठ्ठल रखुमाईच्या आशीर्वादाने व कृपेने श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती (रजि.) व रुक्मिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पंचक्रोशीत विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमही राबवले जात आहेत. या मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!