प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेतून श्री सतीश येरम कुटुंबीयांना 2लाख मंजूर

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेतून श्री सतीश येरम कुटुंबीयांना 2लाख मंजूर

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेतून श्री सतीश येरम कुटुंबीयांना 2लाख मंजूर*

*शाखा व्यवस्थापक श्री. सागर साटम यांचे विशेष प्रयत्न*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कासार्डे चे व्यवस्थापक श्री .सागर साटम यांनी कासार्डे येथील श्री सतीश येरम यांना 20 रुपयांच्या प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेतून दोन लाख रुपये मिळवून देण्याचे प्रयत्न आज अखेर मार्गी लागले
सत्यविजय धोंडू येरम वय 62 रा .नाग सावंतवाडी यांचा जुलै महिन्यात घराजवळील झाडावर चढत असताना जमिनीवर पडून मृत्यू झाला होता याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा कासार्डे चे शाखा व्यवस्थापक श्री. सागर साटम यांना समजताच श्री सत्यविजय येरम यांचे आपले शाखेत खाते असल्याचे माहित झाल्यावर येरम यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांची पत्नी सुवासिनी सत्यविजय येरम व मुलगा श्री सतीश सत्यविजय येरम यांना सदर लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतली आणि अवघ्या तीन महिन्यातच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे 2 लाख खात्यावर जमा झाले यासाठी शाखा व्यवस्थापक श्री .सागर साटम यांनी विशेष प्रयत्न केले असून येरम यांच्या कुटुंबीयांना धनादेश सुपुर्द करण्यात आले यावेळी धनादेश देताना शाखा व्यवस्थापक श्री सागर साटम , श्रीम. वंदना राणे, अर्पणा गुरव ,प्रशांत परब आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!