*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला सातेरी जत्रौत्सव ५ नोव्हेंबर रोजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रौत्सव त्रिपूरारी पौर्णिमा, बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी नित्यपूजा, ९ वा. श्री सातेरीच्या पालखीचे आगमन, रात्रौ ११ वा. श्री देव रामेश्वराच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर तरंगदेवता आणि श्री सातेरीच्या पालखीची मंदिराला प्रदक्षिणा, त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल. उत्सवानिमित्त पुष्पपूजा, फुलांची सजावट आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी जत्रौत्सवास उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

