आचरा पिरावाडी येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत जीजी सारंग यांचे निधन

आचरा पिरावाडी येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत जीजी सारंग यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*आचरा पिरावाडी येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत जीजी सारंग यांचे निधन*

*मालवण (प्रतिनिधी)*

आचरा पिरावाडी येथील रहिवाशी व ज्येष्ठ नाट्य कलावंत श्री. काशिनाथ उर्फ जीजी अनाजी सारंग (वय ७८) यांचे आज शनिवारी पिरावाडीतील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

जीजी सारंग यांनी नाट्य, कला व गायन क्षेत्रात बहुमोल असे योगदान दिले. पिरावाडीमधील हौशी रंगभूमीवरील व सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडीचे तसेच श्री तरुण संघ दक्षिणवाडा चे ते माजी अध्यक्ष होते. श्री देव चव्हाटा याचे ते मानकरी होते. मध्यंतरीच्या काळात सारंग हे रापण मासेमारी व्यवसाय करायचे. त्यांच्या निधनाबद्दल आचरा पंचक्रोशी तसेच कला क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई , पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!