चिंदर अपराजवाडी येथे 2नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

चिंदर अपराजवाडी येथे 2नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

*कोंकण एक्सप्रेस*

*चिंदर अपराजवाडी येथे 2नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह*

*मालवण दि प्रतिनिधी*

चिंदर अपराजवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे रविवार २ नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहा दिवशी सकाळी ९ वाजता घट स्थापना करुन सप्ताहाला सुरूवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपर्यंत सप्ताह सुरु राहणार आहे. यानंतर मंगळवारी ४ नोव्हेंबर ला सकाळी ब्राह्मण देव मंदिरात होम आणि श्री देवी पावणाई मंदिरात महाप्रसाद

५ नोव्हेंबर ला श्री ब्राह्मणदेव मंदिरात सायंकाळी ७ वाजता त्रिपोरी उसंव
७ नोव्हेंबर ला वाघबीळ येथे डाळप
८ नोव्हेंबर ला सकाळी काला आणि सायंकाळी सत्यनारायणाची महापूजा रात्री ९ वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अपराजवाडी कोंडवाडी ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!