तळेरे, कासार्डेमध्ये “विकेंड लाॅकडाऊनला” उस्फूर्त प्रतिसाद

तळेरे, कासार्डेमध्ये “विकेंड लाॅकडाऊनला” उस्फूर्त प्रतिसाद

*कोकण Express*

*तळेरे, कासार्डेमध्ये “विकेंड लाॅकडाऊनला” उस्फूर्त प्रतिसाद*

*तळेरे,कासार्डेमध्ये “विकेंड लाॅकडाऊनला” उस्फूर्त प्रतिसाद*

*तळेरे  ः प्रतिनिधी*

शनिवार-रविवार शासनाच्या आदेशाप्रमाणे तळेरे व कासार्डे बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय “वीकेंड लॉकडाउन” करिता कडकडीत बंद ठेवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.
तळेरे ग्रापने यापूर्वीच जिल्हा अधिकारी यांच्या सूचनेनुसार आठवडा बाजार बंद ठेवण्याची कार्यवाही केली असून पुढील मंगळवारचा आठवडा बाजार पुर्णपणे बंद ठेवण्यात येईल अशी माहिती ग्रामविस्तार अधिकारी युवराज बोराडे व सरपंच सौ. साक्षी सुर्वे यांनी दिली. शासनाच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी शनिवारी सर्व दुकाने कडकडीत ठेवून बंद पाळला. यापुर्वीही ठराविक दुकाने एक फळी उघडून तर रिक्षा, सिक्ससीटरची तुरळक वाहतूक, दुचाकीस्वार यांची अवचित फेरी रस्त्यावरून होती. शनिवारी मात्र ऑफिसेस, खोकेधारक, कोल्ड्रिंक, हॉटेल, भाजी, भुसारी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बेकरी इतर सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. मेडिकल, दवाखाने, पार्सल सेवा सुरू होती. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहने, माणसे फिरताना दिसत होती. शनिवारी या दोन्ही गावात सुनसान स्थिती होती.
एकंदरीत सर्वांच्या सहकार्यामुळे प्रशासनावरील बंदोबस्ताचा भार आज कमी दिसत होता.
कासार्डे,तळेरे बाजारपेठ या नेहमीच वर्दळीची ठिकाणे तरीही आज शासनाने केलेल्या आवाहनाला ग्रामस्थ,व्यापारी वर्गाने केलेल्या उत्कृष्ट सहकार्य मुळे हा लाॅकडाऊन कडकडीत पाळण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!