वेंगुर्ला हायस्कूलच्या खेळाडूंची विभागस्तरावर मजल

वेंगुर्ला हायस्कूलच्या खेळाडूंची विभागस्तरावर मजल

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला हायस्कूलच्या खेळाडूंची विभागस्तरावर मजल*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेष गुरव*
जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलच्या सहा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत विभागस्तरावर मजल मारली आहे.
यामध्ये हर्ष म्हाडदळकर याने लांब उडीमध्ये प्रथम व मान्यता पेडणेकर द्वितीय, राज प्रजापती १०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय, ८०० मीटर धावणेमध्ये विधी परब प्रथम, बुद्धिबळमध्ये विठ्ठल कोरगांवकर चतुर्थ यांनी क्रमांक पटकाविले असून अरमान अब्दुल शमी शेख याची कबड्डी निवड चाचणीमध्ये १७ वर्षाखालील गटात निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना आर.डी.केर्लेकर, टी.आर.गायकवाड, संजिवनी चव्हाण, संदिप पेडणेकर व दिलीप मालवणकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे मुख्याध्यापक एस.ए.बिडकर, पर्यवेक्षक आर.व्ही.थोरात यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!