वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी दाभोली गावचे युवा नेतृत्व श्री.सखाराम(दादा) सचिन सारंग इच्छुक

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी दाभोली गावचे युवा नेतृत्व श्री.सखाराम(दादा) सचिन सारंग इच्छुक

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी दाभोली गावचे युवा नेतृत्व श्री.सखाराम(दादा) सचिन सारंग इच्छुक*

*वेंगुर्ला : प्रतिनिधि*

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी दाभोली गावचे युवा नेतृत्व महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.सखाराम(दादा) सचिन सारंग इच्छुक असुन निवडणूक लढवणार असल्याचे समजते दादा सारंग यांनी यापूर्वी सरपंच पदासाठी थेट निवडणूक लढवली होती काही अंतर्गत राजकारणामुळे पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले होते.
सामाजिक कार्याच व्रत अंगी कारलेल्या या माणसाने सामाजिक बांधिलकी कायम जोपासली पराभव होऊन सुद्धा जनतेच्या अडी अडचणीला धाऊन जात गरजवंतांना आर्थिक मदत करणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे विभागातील विविध मंडळांना आर्थिक सहकार्य करणे धार्मिक कार्यात सहभाग घेणे क्रिकेट क्षेत्रात सहभाग घेऊन स्पर्धा घेवून युवकांना प्रोसाहन देणे. असे अनेक उपक्रम त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले समाजसेवेचे कार्य अविरत पणे सुरू ठेवले‌. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत असताना युवासेना उपतालुकाप्रमुख म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले आहे.पण काही कारणास्तव त्यांनी त्या पदाचा राजीनामा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकला.
आणि काही दिवसात सावंतवाडी मतदार संघाचे आमदार श्री. दीपक भाई केसरकर यांची भेट घेतली आणि वेंगुर्ला मधून युवा चेहरा म्हणून त्यावेळी सुरवातीलाच शिवसेना (शिंदे) गटात अधिकृत पक्षप्रवेश केला.सरपंच निवडणूक जाहीर झाली आणि शिवसेना (शिंदे) गटातून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती परंतू दादा सारंग यांना डावलण्यात आल्याने निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर दादा सारंग यांना डावल्याचे लक्षात येताच सारंग यांनी आपले गाव विकास पॅनल उभे केले आणि सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून आपली युवा नेतृत्व म्हणून विरोधकांना ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर दादा सारंग यांनी शिवसेना (शिंदे) गटात नाराज होत कुठलाही पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थित न राहिल्याने उघड पणे नाराजी व्यक्त केली सध्या तरी सरपंच निवडणुकीनंतर आपण कुठल्याही पक्षाचे काम करत नसून येणाऱ्या जिल्हा परिषद आडेली मतदार संघातून अपक्ष म्हणून किंवा जो पक्ष आपला विचार करून उमेदवारी देईल त्या पक्षासोबत राहून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.दादा सारंग यांच्या मालकीचा साई स्पोर्ट्स दाभोली नावाने क्रिकेट संघ आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे शिवाय थोर मोठ्यांसोबत मतदार संघात त्यांचे चांगले संबंध असून सध्या तरी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत. त्यामुळे हा युवा चेहरा भविष्यात कोणता निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!