*कोंकण एक्सप्रेस*
*रांगोळी, किल्ले स्पर्धा आणि दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेष गुरव*
माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे दिपावलीचे औचित्य साधून महिलांसाठी ऑनलाईन रांगोळी स्पर्धा, मुलांसाठी ऑनलाईन किल्ले स्पर्धा तसेच दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.
रांगोळी स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी आपल्या घरीच रांगोळी काढून ती पूर्ण झाल्यानंतर त्याचे दोन एचडीमधील फोटो ९९२३४८२६५८ या व्हॉटसअॅप नंबरवर २३ ऑक्टोबरपर्यंत पाठवावयाचे आहेत. स्पर्धकांनी पाठवलेला फोटो हा गुगल स्कॅल केला जाईल. या स्पर्धेसाठी विषयांचे किवा वयाचे बंधन ठेवण्यात आलेले नाही. रांगोळीमध्ये आकर्षक रंगसंगती आवश्यक आहे. रांगोळीखाली नाव आणि तारीख लिहिणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम तीन नंबर काढण्यात येतील.
मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व आपल्या ऐतिहासिक शिवकालीन गड किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून ऑनलाईन किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी २३ ऑक्टोबरपर्यंत किल्ल्याचा संपूर्ण व्हिडीओ, किल्ल्याबरोबर एक ग्रुप फोटो (एचडीमधील) ९५४५५७४८०८ या व्हॉटसअॅप नंबरवर पाठवावा. स्पर्धकाला बनवलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची किमान दोन मिनिटे माहिती सांगता येणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी पाठवलेला फोटो गुगल स्कॅन केला जाईल. ही स्पर्धा खुली असून वयाचे बंधन नाही.
दि. २४ ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक ८ वाजता माणिकचौक येथे सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल पुरस्कृत रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

