असलदे सोसायटीच्या 101 शेअर्स धारकांना 10 टक्के लाभांश वाटप – भगवान लोके

असलदे सोसायटीच्या 101 शेअर्स धारकांना 10 टक्के लाभांश वाटप – भगवान लोके

*कोंकण एक्सप्रेस*

*असलदे सोसायटीच्या 101 शेअर्स धारकांना 10 टक्के लाभांश वाटप – भगवान लोके*

*ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था सलग 4 वर्षे नफ्यात ; संस्थेची उलाढाल पोहोचली 81 लाखांवर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., असलदे या संस्थेला चालु आर्थिक वर्षात 1 लाख 76 हजाराचा नफा झाला आहे. संस्थेच्यावतीने ज्या सभासदांनी शेअर्स गुंतवणूक केली आहे. त्या सभासदांना 10 टक्क्यांनी लाभांश वाटपाचा निर्णय नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवार दि. 15 ऑक्टोंबर 2025 रोजी दिवाळी सणाच्या पूर्वी 101 सभासद शेअर्स धारकांना 61 हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत . ना. नफा ना तोटा तत्वावर चालणारी ही विकास संस्था नवीन संचालक मंडळाने पदभार स्विकारल्यानंतर सलग 4 वर्षे नफ्यात आल्याने शेतक-यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत असल्याने आम्ही केलेल्या कामाची आशिर्वाद रुपी पोहोच पावती आम्हाला मिळत असल्याची माहिती असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी दिली आहे.
असलदे सोसायटीच्या शेअर्स धारक सभासदांच्या सिंधुदुर्ग बॅंकेच्या खात्यावर ही लाभांश रक्कम बुधवारी जमा करण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षात सातत्याने नवीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात संस्थेला सातत्याने नफा होत असून त्याचा लाभांश स्वरुपात शेतक-यांना थेट नफा वाटप करत आहोत. संस्था स्थापनेला 61 वर्षे पूर्ण होत असून आजपर्यंत या संस्थेत चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालक म्हणून अनेकांनी काम केले. इवल्याशा लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. असलदे सोसायटीची उलाढाल 81 लाखांवर जावून पोहोचलेली आहे. जिल्ह्यातील पहिल्या 5 विकास संस्थांमध्ये असलदे सोयायटीचे काम आहे. असलदे सोसायटी ही कणकवली तालुक्यात बॅंक व संस्था पातळीवर 100 टक्के वसुल पात्र एकमेव संस्था ठरली आहे. भविष्यात ही संस्था सहकार क्षेत्रात जिल्ह्यात आदर्श संस्था म्हणून काम करेल असा , विश्वास चेअरमन भगवान लोके , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर व संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!