शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित रील स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित रील स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित रील स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण*

*कणकवली | प्रतिनिधि*

श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव

कणकवली येथे श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित रील स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना उपनेते मा. श्री. संजय वसंत आग्रे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत अनेक तरुणांनी आपली कल्पकता आणि सृजनशीलता सादर केली. त्यामध्ये —
🥇 प्रथम क्रमांक – सिद्धेश चव्हाण
🥈 द्वितीय क्रमांक – अथर्व रेवडेकर
🥉 तृतीय क्रमांक – प्रथम जानकर
यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद संपादन केले.

कार्यक्रमास युवा सेना सिंधुदुर्ग सचिव श्री. निलेश मिस्त्री, युवा सेना तालुकाप्रमुख श्री. सौरभ सुतार, राज पटेल, तसेच मंडळाचे पदाधिकारी, स्पर्धक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. संजय आंग्रे साहेबांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत सांगितले की,“अशा उपक्रमांमुळे तरुणाईला आपली कला आणि कल्पकता सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट मंच मिळतो. समाजातील सकारात्मकता आणि संस्कार वृद्धिंगत करण्यासाठी हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.”

साहेबांनी पुढे आश्वासन दिले की,  “अशा सांस्कृतिक आणि सृजनशील उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य राहील.”

कार्यक्रमाचा समारोप मंडळाच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून करण्यात आला.
मंडळाचे तसेच सर्व विजेते स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!