कुवळे गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अक्षता लाड यांची निवड*

कुवळे गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अक्षता लाड यांची निवड*

*कोंकण एक्सप्रेस*

*कुवळे गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अक्षता लाड यांची निवड*

*शिरगांव | संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील कुवळे – रेंबवली गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कुवळे गावामध्ये बचत गटाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने समाजसेवेचे काम करत असलेल्या अक्षता गुरुनाथ लाड यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

कुवळे ग्रामपंचायत येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली. सरपंच सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या सभेमध्ये कुवळे गावाच्या इतिहासामध्ये प्रथमच एका महिलेला हा सन्मान मिळालेला आहे. ग्रामसभेमध्ये एकमताने अक्षता लाड यांची तंटामुक्तीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लाड यांच्या निवडीने कुवळे गावातील तंटे अतिशय चांगल्या पद्धतीने मिटतील असा विश्वास सरपंच सुभाष कदम यांनी व्यक्त केला. सदर ग्रामसभेला उपसरपंच सुहास राणे तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी पोवार भाऊ शाळांचे मुख्याध्यापक आणि गावचे आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ या सभेमध्ये उपस्थित होते. या निवडीबद्दल लाड यांच्यावर कौतुकांचा वर्षा होत असून गावचे वतीने त्यांचा विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!