*कोंकण एक्सप्रेस*
*दिव्यांग बांधवांचा शुक्रवारी तळेरे येथे मेळावा : सहभागी होण्याचे आवाहन*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व सह आयोजक स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट तळेरे व ग्रामपंचायत तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत तळेरे येथील डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हा मेळावा तळेरे, दारूम, कासार्डे, ओझरम, साळीस्ते या गावातील दिव्यांग बांधव सहभागी होऊ शकतात. या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी,घरकुल आदी योजनांची माहिती दिली जाईल. तसेच, गरजू साहित्याची नोंदणी केली जाणार आहे. तसेच कमी दृष्टि, पॅरालीसीस, अपघात यामुळे आलेल्या दिव्यांगाची नोंद केली जाणार आहे. व ऑनलाईन नोंदणी केली जाईल. तसेच ज्यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र नसेल किंवा स्वावलंबन कार्ड नसेल तर त्याचीही नोंद केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
UDID स्वावलंबन कार्ड
अपंग प्रमाणपत्र
आधारकार्ड
रेशनकार्ड
पासपोर्ट फोटो (अस्थिव्यंग असल्यास ४ बाय ६ चा फोटो)
उत्पन्न दाखला (५०,००० च्या आत)
रहिवाशी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला
बँक पासबुक
वरील कागदपत्रे असल्यास येताना सोबत आणावीत.
तळेरे, दारूम, कासार्डे,ओझरम, साळीस्ते या गावातील दिव्यांगांसाठी हा मेळावा आहे.
अधिक माहिती साठी संपर्क : संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे (9765979450)

