*कोंकण एक्सप्रेस*
*अतिरिक्त ‘सीईओ’ पदी शितल कबनुरे-पुंड यांची नियुक्ती*
*सिधुदुर्गनगरी ता. २९ :*
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी श्रीमती शितल. कबनुरे-पुंड यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस यांची सिंधुदुर्ग येथे नियुक्ती झाल्यापासून ते सातत्याने सुटीवर जात असायचे. अलीकडे त्यांनी शासनाकडे स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. मात्र, शासनाने ती नाकारली. सातत्याने गैरहजर राहत असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी होत परिषदेत हजर होत आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. होती. अखेर शासनाने त्यांची रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक या पदावर बदली केली आहे. बदलीने रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर श्रीमती कबनुरे-पुंड यांची नियुक्ती. शासनाने केली. यापूर्वी त्यांना मंत्रालय महिला बालविकास गोदीया अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी पदावरत्यांनी काम केले होते आज जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला 
