*कोंकण एक्सप्रेस*
*दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी शिवसेनेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
नेहमी शहराच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मदत करत आमदार केसरकर यांचा वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका अॅड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, आणि तालुका प्रमुख दिनेश गावडे नगरसेविका शर्वरी धारगळकर, अॅड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, अजय गोंदावळे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, शैलेश मेस्त्री, सुनील नाईक, हर्षा जाधव, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, भारती परब, राजश्री निर्गुण आणि निलम कुमठेकर आदींसह शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

