जिल्हातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार :-तृप्ती धोडमसे ,जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग

जिल्हातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार :-तृप्ती धोडमसे ,जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार :-तृप्ती धोडमसे ,जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग*

पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग नुतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमसे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पर्यटन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली तसेच जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा स्वदेश दर्शन 2.0 या मध्ये समाविष्ट असून त्या माध्यमातून बीच टुरिझम बरोबर ऍग्रो,हिस्ट्री,मेडिकल,फॉरेस्ट,मँग्रोज,धार्मिक टुरिझम साठी सर्वसमावेश विकास आराखडा बनविण्याची विनंती करण्यात आली त्यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीचा विचार करून जिह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार तसेच जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी आवश्यक मुद्याचे प्रस्ताव बनून द्या त्याप्राणे आवश्यक अधिकारी वर्गाची घेऊ तसेच पर्यटन वाढीसाठी कार्य करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास ही सहकार्य करणार असे सांगीतले अशी माहिती श्री विष्णु मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यानी दिली यावेळी अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ,टी टी डी एस अध्यक्ष सहदेव साळगावकर टीटीडीएस कार्याध्यश रविंद्र खानविलकर पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, देवानंद लोकेगावकर,रामा चोपेड़ेकर ,जीवन भोगावकर,मनोज खोबरेकर, क्यालिस फ़र्नाडिस आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!