तो” घडलेला प्रकार अंत्यत निंदनीय :दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख संजय गवस

तो” घडलेला प्रकार अंत्यत निंदनीय :दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख संजय गवस

*कोंकण एक्सप्रेस*

*तो” घडलेला प्रकार अंत्यत निंदनीय :दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख संजय गवस*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

काल कोनाळकट् येथे. चारचाकी वाहन जळीत जो प्रकार घडला ,तो अत्यंत निंदनीय असून.. अशा प्रकारच्या घटनेचे समर्थन समाजातील कुठल्या व्यक्ती करणार नाही.. कायदा हातात घेऊन ,नको तो प्रकार करायचा , याला खतपाणी घालणारे शासन व प्रशासनाचे डोळे आता उघडले असून..अशा प्रकारला आळा घालण्यासाठी आता तरी पोलीस यंत्रणेने आपल्या बळाचा योग्य उपयोग करावा.. असे स्पष्ट मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख संजय गवस यांनी व्यक्त केले आहे..
कोणत्या धर्माचा,समाजाचा असो ,जर चुकीचं कृत्य घडत असेल तर त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे.. चुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दोडामार्ग पोलीस यंत्रणा असताना , कायदा हातात घेऊन गाड्या जळणे ,हे योग्य नाही.. सातत्याने असे प्रकार घडल्यास दोडामार्ग तालुक्यातील जनतेच्या बाबतीत सर्वत्र चुकीचा संदेश जाईल..यांचा पण विचार राजकीय व सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या नेतृत्वाने केला पाहिजे.. घडलेल्या घटनेचा पोलीस यंत्रणा योग्य तपास करतील..एवढी अपेक्षा आम्ही बाळगतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!