*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला पोलिस ठाण्यातर्फे ग्रामस्थांना मार्गदर्शन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
वेंगुर्ला पोलीस ठाण्यातर्फे वायंगणी ग्रामपंचायत आणि दाभोली येथील सातेरी मंदिरात ‘समुद्र संदेश, पोलीस संवादातून आधार‘ या दोन व्हॉटस्अॅप चॅनेलबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना सदर दोन्ही चॅनेलला फॉलो करण्याबाबत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आवाहन केले आहे. याच कार्यक्रमात ‘सायबर गुन्ह्याबाबत व अंमली पदार्थ विषयी‘ जनजागृतीपर माहिती देण्यात आली. वायंगणी येथील कार्यक्रमाला १२० तर दाभोली येथील कार्यक्रमाला ५० ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळी – वायंगणी येथील कार्यक्रमात पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

