हत्ती हटाव शेतकऱ्यांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा पाठिंबा : रविकिरण गवस

हत्ती हटाव शेतकऱ्यांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा पाठिंबा : रविकिरण गवस

*कोंकण एक्सप्रेस*

*हत्ती हटाव शेतकऱ्यांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा पाठिंबा : रविकिरण गवस*

*दोडामार्ग / शुभम गवस*

गेले वीस वर्ष दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी हैदोस घातला असून त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास हा स्थानिक शेतकऱ्यांना झाला आहे. तिलारी दशक्रोशीत मोठ्या प्रमाणात गेल्या 20 वर्षात नुकसान भरपाई झाल्यामुळे शेतकरी बांधव हे मेटाकुटीला आले आहे. वनविभागाकडून मिळणारी तुटपुंजी नुकसान भरपाई म्हणजे शासन शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असून हत्ती हटाव मोहीम ही शेतकऱ्यांची प्राधान्याने मागणी असल्याकारणाने हत्ती हटाव मोहीम शासनाने राबवावी त्यास आमचा पाठिंबा आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले आहे. हत्ती हटाव मोहीम राबवावी ही तिलारी दशक्रोशीतील ग्रामस्थांची प्राधान्याने मागणी आहे. तिलारी दशक्रोशीतच हा हत्ती न राहता सद्यस्थितीत ओंकार हत्ती दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, फुकेरी, तळकट भागासह कळणे, सासोली, मणेरी भागात तसेच गोवा राज्यात देखील हैदोस घालत आहे. त्यामुळे सदर हत्ती बाबत सत्ताधारी हे हत्तींना वनतारांमध्ये नेणार अशा घोषणा जाहीर करत आहेत. वनतारामध्ये हत्ती नेऊन तेथील पर्यटन वाढवण्यापेक्षा सत्ताधारी आमदारांनी तिलारीत हत्ती अभयारण्य उभारणार अशा घोषणा निवडणुकीच्या काळात केल्या होत्या. त्या घोषणांचे पालन करून तिलारी दशक्रोशीत हत्ती अभयारण्य उभारून तेथे रोजगार निर्मिती करता येईल का ? याकडेही कटाक्षाने लक्ष द्यावे. निवडणुका जवळ आल्या की जनतेसाठी गाजर दाखवायचे आणि तदनंतर आश्वासनाचा विसर पडावा अशी सत्ताधाऱ्यांची अवस्था आहे. त्यामुळे सोयीस्कर सत्ताधाऱ्यांनी निवडणुका आता जवळ आल्याने पुन्हा घोषणा तर नाही ना याचेही भान ठेवावे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही असून हत्ती हटाव ही प्राधान्याने शेतकऱ्यांचे मागणी असेल तर हत्ती हटाव मोहीम करण्यात यावी शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये. शेतकऱ्यांच्या, भूमीपुञाच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असल्याची भूमिका सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!