*कोंकण एक्सप्रेस*
*बुरंबावडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संदिप बांदिवडेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
*वाचा सविस्तर बातमी👇*
देवगड तालुक्यातील बुरंबावडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संदिप बांदिवडेकर यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज दि. 23/09/2025 रोजी ग्रा.प.बुरंबावडे गावच्या झालेल्या ग्रामसभेमध्ये सलग दुसऱ्यांदा गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संदिप बांदिवडेकर यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

