*कोंकण एक्सप्रेस*
*बॅडमिंटन स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीच्या विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड*
*कणकवली – प्रतिनिधी*
क्रीडा व युवक सेवा संचनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस यांच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या २७ संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत विजय मिळविला. तसेच १४ वर्षखालील गटात २१ संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रशालेच्या १४ वर्षाखालील संघाने तृतीय क्रमांक मिळविला. १७ वर्षाखालील मुलांच्या संघाची सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे शि. प्र. मं. कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू , ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे व शिक्षकवृदांनी अभिनंदन केले

