*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर कणकवलीच्या विद्यार्थ्यांची तलवारबाजी स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड*
*कणकवली : प्रतिनिधी*
क्रीडा व युवक सेवा संचनालाय ,पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, ओरोस व विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय तलवारबाजी स्पर्धा एचपीसीएल सभागृह कणकवली येथे पार पडली.
या स्पर्धेत आपल्या प्रशालेच्या दोन विद्यार्थीचे कोल्हापूर विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली.
१४ वर्षाखालील मुले
शिवांग सुदिन पेडणेकर
(ईपी प्रकारात – प्रथम,
सेबर प्रकारात- तृतीय )
१७ वर्षखालील मुली
अवनी राजेंद्र मणचेकर
(सेबर प्रकारात-प्रथम ,
ईपी प्रकारात- तृतीय )
वरील विद्यार्थीची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली.यशस्वी विद्यार्थीचे शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉक्टर राजश्री साळुंखे अध्यक्ष दत्तात्रय तवटे सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू,ट्रस्टी अनिल पंत डेगवेकर, मुख्याध्यापक डॉ. पिराजी कांबळे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

