#कोंकण एक्सप्रेस*
*व्हॉलीबॉल स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचे यश*
*कणकवली – प्रतिनिधी*
क्रीडा व युवक सेवा संचनालाय, पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय ,ओरोस आयोजित कणकवली तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल ,कळसुली येथे पार पडल्या. या स्पर्धेत विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या
१७ वर्षाखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांची शिक्षण प्रसारक कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू , ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, मुख्याध्यापक पिराजी कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे यांनी अभिनंदन केले.

