आमदार केसरकर यांच्या घोषणेला अपशकुन न करता स्वागत करावे ; सुनील गवस ग्रामपंचायत सदस्य मांगेली.

आमदार केसरकर यांच्या घोषणेला अपशकुन न करता स्वागत करावे ; सुनील गवस ग्रामपंचायत सदस्य मांगेली.

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार केसरकर यांच्या घोषणेला अपशकुन न करता स्वागत करावे ; सुनील गवस ग्रामपंचायत सदस्य मांगेली..*

*दोडामार्ग, शुभम गवस*

तालुक्यातील हत्ती प्रश्न हा अतिशय गंभीर बनलेला असून दोडामार्ग तालुक्याबरोबरच नजीकच्या गोवा राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. जर आमदार केसरकर शासनाच्या माध्यमातून या हत्तींना वनतारामध्ये नेण्यासाठी प्रयत्न करत असतील. तर त्यांचं स्वागतच झालं पाहिजे. कर्नाटक मधून ज्यावेळी हत्ती दोडामार्गच्या दिशेने आले त्यावेळी मांगेलीतील शेतकऱ्यांचे बागायती पूर्णपणे उध्वस्त करून टाकल्या त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा तालुक्यातील इतर ठिकाणी वळविला व त्या ठिकाणी मुक्काम करून आज गेली कित्येक वर्षे शेतकऱ्यांचे नुकसान तर केलेच त्यात अनेक जणांचे बळी सुद्धा गेले. त्यामुळे जर या मतदारसंघाचे आमदार स्वतःची जबाबदारी म्हणून सर्व हत्तींना वनतारामध्ये नेण्यासाठी प्रस्ताव मांडत असतील तर त्याचे सर्व स्तरातून स्वागत झालं पाहिजे व त्यास पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे आमदार श्री केसरकर यांनी घेतलेल्या निर्णयाचे अपशकुन न करता स्वागत केल्यास योग्य होईल असे वाटते असे माध्यमांशी बोलताना सुनील गवस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!